पिक्चर अभी बाकी है...

दिवस तसा नवासा वाटला होता
थोडासा तिला हवासा वाटला होता

पघळलेली साडी तिने आवरली
कुंकू मात्र नावाला होतं, अगदी उत्तरेला कललेलं.
ब्लाऊजची बटनं दोन उघडीच होती, त्यातलं एक तुटलेलं
लाल रंगाचं घबाड मात्र नखानं उभं फाटलेलं

नवराच म्हणून होता, पण प्रेम होतं आटलेलं
विस्कटलेल्या केसासहीत त्याने सारं सारं शरीर लाटलेलं

पैजण नव्हती पायात पण काहीतरी वाजलेलं
गुणगुणत होती गाणं ते कोरड्या मनातं दाटलेलं

विसरून गेली होती ती जे काल होतं घडलेलं
उचलून ठेवलं मग तीने जे निरोधच पाकीट पडलेलं

विसावलं शरिर आता, बरचं होतं थकलेलं
लावत होती बटन जे काल होतं तुटलेलं

इतक्यात मात्र कोणीतरी दार आता ठोकावलं
'ले और एक मर्द आया' म्हणतं आत कोणीतरी डोकावलं.

कालच्या प्रयोगानंतर 'ते' पिक्चर नव्हतं संपलेलं
कोठ्यातच जग तिचं, 'रांड' तिचं नाव ठरलेलं...

Comments

Popular Posts