क्योंकी 'प्रेशर' जरूरी है

Force upon area म्हणजे प्रेशर. जिथका area कमी तितका प्रेशर जास्त असतो. मग म्हणाल तर प्रेशर हे वेगवेगळं असतं. Physics मधलं हे आलचं but कामाचं प्रेशर, लोकलमध्ये मागून ढकलणाऱ्याचं प्रेशर,blood प्रेशर, प्रेशर कुकरचं प्रेशर, संडासात लागणारं प्रेशर...असो.

प्रेशर हे प्रेशरचं असतं. न्यूटन म्हणायचा, every body continuous in state of motion and direction unless other unbalanced force acted upon it थोडक्यात काय तर प्रत्येकजण आपलं आपलं काम निवांत करत असतं जोपर्यंत कोणी उंगल्या करत नाही तोपर्यंत. उदा.निवांत काम करणारा emlpoyee बॉसने सांगितल्याशिवाय काम करत नसतो. काही जणांना वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं ते चहाने, काहींना तंबाखूने तर काहींना मशेरीने येत असतं. या प्रकारात प्रेशरला आवाज वैगेरे असतो कधी कधी वासही. जाऊदे जास्त डिटेलिंग नको. मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांवर येणारं प्रेशर वेगळं असतं. ते त्याच्यां मागे उभे असणाऱ्याच्या बैगेवर किंवा त्याच्या पोटाच्या आकारमानावर depend करतं(इथे force आणि area जास्त matter करतात). लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना हे प्रेशर कामी येतं. तासाभराचं काम मिनिटांत उरकण्याची अफाट शक्ती प्रेशरमध्ये असते. म्हणून कोणतेही काम करायचं असेल तर प्रेशर जरूरी है.

Comments

Popular Posts