तो आणि ती

बोलता बोलता सहजच 'तो' काहीतरी बोलून जातो,त्याचं त्याला काहीच कळत नाही पण त्या बोलण्याचं गांभीर्य तिला कळतं. उगाच रुसवा धरून 'ती' त्याच्याशी भांडू लागते. पण त्याचं म्हणणं हे तसं नसतचं मुळी. मग तो तिला  समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागतो. पण ती काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते. न राहून तिला गमावण्याच्या विचाराने शांत होतो. पण 'ती' हळूच हसत हसत ह्या विषयापासून त्याला नकळत दूर नेते. कारण तिलाही 'त्याला' गमवायचं नसतं...

Comments

Popular Posts