बवाल

इथे शिक्षणाने कुणी
भिम झाला
इथे रावणाने कुणी
राम झाला

इथे जिहादाने कुणी
कसाब झाला
इथे लेखणीने कुणी
साहेब झाला

इथे जिजाऊने कुणी
शिवा झाला
इथेच बंडाने कुणी
जिवा झाला

देवामुळेच आता देव्हारा
रिक्त झाला
आणि भाजपाने कुणी
भक्त झाला

करेल जो हटके
त्याचाच बोलबाला
उगाच नाही भावा
त्याचा बवाल झाला

नाहीच काही त्याचा
प्यालाच रिक्त झाला
नाहीच काही त्याचा
इथेच खेळ झाला

Comments

Popular Posts