ती

तिच्या उशाशी असलेला माझा दुमडलेला हात. थोडासा अवघडलेला पण हवाहवासा. तिच्या कपाळावरची चंद्रकोरही हसावी इतकी ती 'सुंदर'. डोळे मंद मिटलेले. डोळ्याच्या मलपेवर स्पष्ट दिसणारी नसांची एक सुंदर जाळी. भुवया फक्त नेहमीप्रमाणे डोळ्यांचा तालावर नाचत नव्हत्या. नाकात 'नाकातलं' होत, तिला नथीची हौस तशी नव्हतीच पण नाकावरचा राग तसा आज कुठेतरी मिसींग होता. ओठावरचा ओलावा अगदी सगळं काही विसरून टाकणारा. एका डोळ्याने पाहीले तर गालावरचे ते तांबूस 'लव' पंख्याने झुलतायत. मग मलाही त्या पंख्याचा आणि वाऱ्याचा जरा रागच आला. कर्णफुलीने कान थोडासा जड वाटला. मग हलकेच माझा हात तिच्या त्या सोनेरी केसात फिरू लागला. कपाळावरून रेंगाळणारी एक बट तिच्या डोळ्यासमोर आली. मग अलगद त्या बटेला बाजूला सारून तिच्या त्या लोभसवाण्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या कपाळावर आपल्या ओठांनी स्पर्शावे. आणि हलकेच तिला आयुष्यभरासाठी आपल्या छातीशी लावावे. ते ही कायमचचं. सुखं म्हणतात ते नेमकं हेच असावं का?..

Comments

Popular Posts