खोटा पाऊस
मी टप टप
ती कोसळणारी सर
ते तुटके छप्पर
खुणावते फार
ये आडोशाला
थांब थोडे
तोकडे छप्पर
अंतर नडे
तो चिंब देह
गच्च गरगर
मग थंड लहर
वर ओठांची थरथर
ती ओलसर बट
गोऱ्या गालावर
भरकटे मन
येई भानावर
पाऊसही नीच
गेला येऊन
कोल्ह्याचं लगीन अन्
डोक्यावर ऊन
नितळला देह
मस्त चकाकी केसावर
अन् चुकलेली कविता
'खोट्या' पावसावर....
Comments
Post a Comment