पाचार
आता पुरे झालं
सहनशक्ती संपली होती
आता त्या बॉसची
माझी बरीच जुंपली होती
करा काम काढा घाम
उगाच शाळा भरली होती
कळून चुकलं आपल्या उरावर
त्याची बढती ठरली होती
नसतं काम नेहमीच
लोकं उगाच थांबली होती
आणि सकाळची भाजी
खरचं आता आंबली होती
जाऊ का घरी कारण
रात्र बरीच झाली होती
निघतो म्हटलं तर त्याची
किटली गरम झाली होती
उपसावी तलवार अन्
बंड करायची फक्त खोटी होती
कळून चुकायचं मग आपली पोस्ट
त्याच्यापेक्षा बरीच छोटी होती
12 च्या ठोक्याला मात्र
शाळा आता सुटली होती
खरचं सांगतो धावत पळत
शेवटची लोकल भेटली होती
आयच्यान् सांगतो
खरचं आता सटकली होती
सकाळ होऊद्या म्हणून
कोंबडी आता झाकली होती
बाप्पाच्या पाय पडलो आणि
अगरबत्तीही लावली होती
ताकद नको कमी पडो म्हणून
आज Glucon-D ही खाल्ली होती
नेहमीचीच लोकल आज बरी
वेळेत पोचली होती
दुर्देवाने आज त्याची वेळ
पुरतीच भरली होती
10 वाजले घड्याळ्यात
मिटींग मग ठरली होती
माहीत नाही कशाला आज
Release ची date ठरली होती
केलं Release म्हणून
शांती बरीच झाली होती
आज नको डोक्याला ताप
कारण सर्दि बरीच झाली होती
सुटलो एकदाचा बाबा
म्हणायची फक्त खोटी होती
पद्धतशीर माझी मारण्याची
त्याची चाल खरचं मोठी होती
भांडण होती ज्याच्याशी
त्याच्याशीच गाठ मारली होती
तिसऱ्या महायुद्धाला त्याने
पद्धतशीर पाचार मारली होती....
Comments
Post a Comment