स्मशानाच्या वाटेवर

एरव्ही नसतं कोणी
कुत्रही ही रस्त्यावर
आज रस्त्यावर फुलं अन् तू
स्मशानाच्या वाटेवर

कोणा नसते फिकर
मरतोस तू कामावर
सहानुभूती मिळते फक्त
स्मशानाच्या वाटेवर

भूक भलीमोठी
जगतोस तू कर्जावर
किंमत ठरते मग तुझी
स्मशानाच्या वाटेवर

virtual झाली दुनिया
टाकते फोटो fb वर
कमेन्ट हि तो करतो मग
स्मशानाच्या वाटेवर

वरवर असते दुनिया
मारते तुला फाट्यावर
कळून चुकते फक्त
स्मशानाच्या वाटेवर

Comments

Popular Posts