ढापलेली कविता

एक होती कविता 
सहजचं वाचली
तिच्यापेक्षा काही म्हणा
हिच बरी वाटली

यमक होते जोडीला
मग मनात बरीच नाचली
शब्दांचे ते खेळ अन्
मनात खोल रुचली

थोडा आता भाव खावा
म्हणून फेसबुकवर टाकली
आम्हीच केलीय कविता
पण कवी आम्ही नकली

वाट होतो बघत
अन् नेमकी तिनेच वाचली
लाईक करून लगेच
कमेन्ट तिने टाकली

"अरे व्वा, किती छान !
तूच का रे लिहली?"
नाही म्हणू कसा...?
"अगं खरचं मी लिहली"

अजून एक लिहशील का?
अगदी सहजचं 'ती' म्हटली
आता मात्र काय लिहू
शप्पथ खरोखरचं फाटली

"अगं कारण लागतं लिहायला
उगाच का मी लिहली"
तात्पुपरती का म्हणा
पण वेळ मात्र मारली

चारचौघात बोलू कसा 
कारण कवी मी नकली
सहज मात्र वाचता वाचता
अख्खी कविताच ढापली

उसनी होती कविता
अगदी 'सहजच' खपली
'अनुभवाची' त्याची शिदोरी 
अगदी स्वस्तात मी विकली

Comments

Popular Posts