ईराणी चाय

पुन्हा तोच टेबल आणि
'त्याला' याद तिचीच आली
मस्का होता पावाला
सोबत चाय ईराणी आली

पाणी आणून ठेवल बाजूला
"म्हणाला साब और कुछ?"
"मैने कुछ मांगा क्या?
तो और मत पुछ..."

तो गेला निघून तसाच
वळून मागे पाहत होता
ड्रावर ओढून मागे
काहीतरी शोधत होता

सापडत नव्हतं त्याला
तसचं 'त्यालाही' सापडत नव्हतं
कारण काही कळेना
मनाला ते पटत नव्हतं

गरम चहा फुकत थोडा
पाव आत सारत होता
ती रिकामी खुर्ची बघायची
मग सवय 'तो' करत होता

विचार करत करत
चाय तशी थंड झाली
एसी नव्हता तिथे
फक्त झुळूक थोडी मंद झाली

मिल गया मिल गया
म्हणत तो ओरडला
नजर फिरली तितक्यात
साहेबही त्याचा ओरडला

"साब ये लो चिठ्ठी
आपके लिए छोडी थी
मेमसाब ने दियी थी
जो आपसे कल लढी थी"

थोडं विचित्र होतं ते
चिट्ठी मग 'त्याने' वाचली
एव्हाना खंबीर असणारी
पुरती होती खचली

भरपूर लिहलं होतं त्यात
मनाला 'त्याच्या' पटलं नाही
भरपूर केलं होतं तरी
शेवटपर्यंत भेटलं नाही

थंड होता चहा
आता पुरता थंड झाला
हरवलेल्या प्रेमाखातिर
'तो' पुरता पुरता झंड झाला

Comments

Popular Posts