Ctrl+S
जे हवं ते सेव्ह करायचं
मंग त्या आयुष्याचा प्रत्येक क्षणाला
थोडक्यात ctrl+S करायचं
टपरीवरच्या चहासोबत
मैत्रीला थोडं miss करायचं
नसतील मित्र सोबत तरी
आठवणींना त्यांच्या trace करायचं
मग आयुष्याचा त्या प्रत्येक क्षणाला
फक्त ctrl+S करायचं
डेली रुटीनला फाट्यावर मारून
स्वप्नानां थोडं chase करायचं
जमतयं सगळं
त्याला काय होतयं? म्हणतं
सगळं सगळं face करायचं
मंग आयुष्याचा प्रत्येक क्षणाला
ctrl+S करायचं
कंटाळवाण्या धीम्या आयुष्याला
कधीतरी race करायचं
More म्हणायचं सुखांना
दुखाना हळूहळू less करायचं
मंग आयुष्याचा त्या प्रत्येक क्षणाला
फक्त ctrl+S करायचं
भेटली तर कानाखाली नायतर
गालावर तिच्या kiss करायचं
जे असेल ते काहीही असो
सरळं सरळं face करायचं
मग आयुष्याचा त्या प्रत्येक क्षणाला
फक्त ctrl+S करायचं
Comments
Post a Comment