शेंदूर
परिसाने सोनं
शेंदुराने देव बनतो इथे
स्वामी असो तिन्ही जगाचा
आईविना कण्हतो इथे
शिक्षणाने साक्षर
संस्काराने माणूस घडतो इथे
कंगाल तोही मनाचा
पैशाने भिकारी बनतो इथे
तलप लागली मनाला
कोणी चुन्याविन मळतो इथे?
निरक्षर मनाचा ठाव
हल्ली दारुने कळतो इथे
जगण्याने मरतो माणूस
सरणाने देह मरतो इथे
दगडातला देव फक्त
शेंदुरानेच कळतो इथे
Comments
Post a Comment